बाजारात हापूस आंबा घेताना वापरा 'या' महत्त्वाच्या टीप्स
सुगंधखऱ्या हापूसचा सुगंध अतिशय गोड आणि नैसर्गिक असतो. देठाजवळ नाकाला लावून वास घेतल्यास तो दरवळतो.
आकार आणि सालहापूस आंबा अंडाकृती आणि खालच्या बाजूला थोडा फुगीर असतो. त्याची साल अतिशय पातळ आणि मऊ असते.
रंगनैसर्गिकरीत्या पिकलेल्या हापूसचा रंग पिवळसर आणि हलका हिरवा असतो.
स्पर्शखरा हापूस हातात घेतल्यावर मऊ आणि नरम लागतो, तर रासायनिक आंबे कडक असतात.
पाण्याची चाचणीआंबा घरी आणल्यावर एका भांड्यात पाण्यात बुडवून ठेवावा. आंबा पाण्यात बुडाला, तर तो नैसर्गिकरीत्या पिकलेला आहे.