रोहितच्या जागी 'टेस्ट ओपनर' म्हणून हे ५ पर्याय

यशस्वी जैस्वालला मिळणार नवा जोडीदार, कोण असेल तो?

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

आता यशस्वी जैस्वालसोबत 'टेस्ट ओपनर' म्हणून भारताकडे ५ पर्याय आहेत.

शुभमन गिल याला कसोटी सलामीचा अनुभव आहे. नियमित ओपनरच्या अनुपस्थितीत त्याने ओपनिंग केली आहे.

केएल राहुल हा कसोटीमधील अनुभवी फलंदाज असून तो कारकिर्दीतील बराच काळ ओपनर म्हणूनच खेळला आहे.

साई सुदर्शन IPLमध्ये दमदार खेळतोय. त्याच्याकडे काऊंटी क्रिकेटचाही अनुभव असल्याने त्याला संधी मिळू शकते.

अभिमन्यू ईश्वरन हा दीर्घकाळ भारत अ संघाचा ओपनर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याचा दांडगा अनुभव आहे.

ऋतुराज गायकवाड हा उत्तम सलामीवीर आहे. संयमी, तंत्रशुद्ध फलंदाजीमुळे  त्याला संघात स्थान मिळू शकते.

Click Here