निसर्गाचा नियमानुसार ज्या गोष्टींचा वापर कमी किंवा बंद होतो हळूहळू त्या गोष्टी लुप्त होत जातात.
निसर्गाचा नियमानुसार ज्या गोष्टींचा वापर कमी किंवा बंद होतो हळूहळू त्या गोष्टी लुप्त होत जातात.
मनुष्यप्राण्याला देखील हा निसर्गनियम लागू आहे. मनुष्याच्या उत्क्रांतीचे टप्पे पाहिले तर मनुष्याला अनेक अवयव वापराविना गमवावे लागलेत.
आपण भविष्यात मनुष्याचे कोणते पाच न वापरातले अवयव नाहीसे होतील याबाबत जाणून घेणार आहोत.
अक्कल दाढ ही मांस आणि कडक अन्न चावण्यासाठी आपले पूर्वज वापरत होते, सध्या मात्र ही अक्कल दाढ त्रासदायक ठरत आहे.
माणूस दोन पायावर चालू लागला तसं त्याच्या शेपटीचा वापर होणं बंद झालं. याच शेपटीशी संबंधित असलेलं माकड हाड मात्र अजून आहे. मात्र त्याची गरज नाहीये.
अपेंडिक्स पूर्वी फायबर प्लांट पचवण्यासाठी उपयुक्त ठरत होतं. आता हे अपेंडिक्स फक्त जठराच्या जीवाणूंना मदत करतो.
आपले पूर्वज मांजर आणि श्वानांप्रमाणे त्यांच्या कानांचे स्नायू आवाजाच्या दिशेने फिरवू शकत होते. आता मात्र अपवाद वगळता असं करता येत नाही. त्यामुळं कानाच्या स्नायूंचा उपयोगच राहिलेला नाही.
मनुष्य प्राणी जेव्हापासून कपडे घालू लागला आहे तेव्हापासून त्याच्या शरीरावरील केसांचे काही काम उरलेलं नाही. हळूहळू हे केस विरळ होत गेले.