ही हळद फिकट पिवळ्या रंगाची असते. तिचा वास आंब्यासारखा मधुर येतो.
आंबे हळदीमध्ये दाहक विरोधी अंटीबॅक्टेरियल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात.
आंबे हळदीच्या सेवनाने चांगली भूक लागते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
लचकणे, मुरगळणे, सुजणे तसेच सांधे सूज यावर आंबे हळदीचा लेप लावला तर चांगला आराम मिळतो.
आंबेहळद अपचन, पोट फुगणे यांसारख्या पोटाच्या समस्यावर आराम देते.
आंबेहळद त्वचेवरील डाग कमी करते त्वचा तेजस्वी करते. त्यामुळे ह्या हळदीचा वापर सौंदर्य प्रसाधने उत्पादनात केला जातो.