महेंद्रसिंह धोनीसह टॉप ५ मध्ये कोण? जाणून घ्या सविस्तर
क्रिकेट जगतातील यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने गमावणारा कॅप्टन आहे.
महेंद्रसिंह धोनीला IPL कारकिर्दीतील २३४ पैकी ९७ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IPL मध्ये कॅप्टन्सीच्या रुपात सर्वाधिक १३७ सामने जिंकण्याचा विक्रमही धोनीच्या नावे आहे. चेन्नईसह त्याने पुणे संघाचे नेतृत्व केले आहे.
विराट कोहली याने RCB चे नतृत्व करताना ७० सामने गमावले आहेत. २०२१ मध्ये त्याने कॅप्टन्सी सोडून बॅटिंगवर फोकस करण्याचा निर्णय घेतला.
या यादीत रोहित शर्माचाही समावेश आहे. आयपीएलमधील १५८ सामन्यात नेतृत्व करताना ६७ सामने गमावल्याचा रेकॉर्ड आहे.
गौतम गंभीरने आपल्या आयपीएल कारकिर्दीत संघाचे नेतृत्व करताना १२९ पैकी ५७ सामने गमावले आहेत.
डेविड वॉर्नरनं ८३ सामन्यात कॅप्टन्सी करताना ४१ लढती गमावल्याचा रेकॉर्ड आहे.