ताकात प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, जीवनसत्त्व बी असे महत्त्वाचे घटक मुबलक प्रमाणात असतात.
ताकातील प्रोबायोटिक्समुळे आतड्यातील चांगल्या जिवाणूंची वाढ होते आणि त्यामुळे अपचन, गॅस, आम्लपित्त, बद्धकोष्ठता अशा तक्रारी कमी होतात.
ताक त्वचेसाठी लाभदायक आहे. नैसर्गिक डीटॉक्सिफायर म्हणून ताक कार्य करतं. शरीरातील अनावश्यक विषारी घटक बाहेर टाकण्यात मदत करतं.
ताकाच्या नियमित सेवनामुळे त्वचा मऊ, उजळ, निरोगी तजेलदार राहते. ताकातील लॅक्टिक ॲसिडमुळे त्वचेच्या मृत पेशी दूर होतात आणि त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो.
ताक केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून, त्यामुळं केसांना पोषण आणि बळकटी मिळते.
वजन कमी करण्यासाठी ताक प्रभावी आहे. यामध्ये अतिशय कमी कॅलरी, चरबी असते, ज्यामुळे वजन वाढत नाही.