भारतातील सर्वात सुरक्षित EV कार्स

या सर्व गाड्यांना मिळाले 5 स्टार रेटिंग, पाहा...


सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तुम्ही EV कार खरेदी करण्याचा विचारात असाल, तर हे पाच मॉडेल्स तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. 


Tata Harrier EV- या 5 सीटर हॅरियर EV ला अडल्ट सेफ्टीसाठी 32 पैकी 32 गुण मिळाले आहेत, तर चाईल्ड सेफ्टीसाठी 49 पैकी 45 गुण मिळाले आहेत. किंमत 21.49 लाख रुपयांपासून सुरू होते.


Mahindra XEV 9e- महिंद्रा कंपनीच्या या 5 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्हीला अडल्ट सेफ्टीसाठी 32 पैकी 32 गुण आणि चाईल्ड सेफ्टीसाठी 45 गुण मिळाले आहेत. किंमत 21.90 लाख रुपयांपासून सुरू होते.



Mahindra BE 6- महिंद्रा BE सीरिजमधील या 5-सीटर EV कारला अडल्ट सेफ्टीसाठी 31.97 आणि चाईल्ड सेफ्टीसाठी 45 गुण मिळाले आहेत. याची किंमत 18.90 लाख रुपयांपासूनसुरू होते.


Tata Punch EV- टाटा पंच EV ने कॉम्पॅक्ट EV सेगमेंटमध्ये जोरदार एन्ट्री घेतली आहे. या कारला अडल्ट सेफ्टीसाठी 31.46 आणि चाईल्ड सेफ्टीसाठी 45 गुण मिळाले आहेत. किंमत 9.99 लाखांपासून सुरू.


Tata Curve EV- टाटाच्या 5 सीटर Curve ला अडल्ट सेफ्टीसाठी 30.81 आणि चाईल्ड सेफ्टीसाठी 44.83 गुण मिळाले आहेत. याची किंमत 17.49 लाख रुपयांपासून सुरू होते.

Click Here