भारतात एलपीजी गॅस आज देशातील ९९.८ टक्के घरांत म्हणजेच जवळपास शंभर टक्के घरांपर्यंत पोहोचला आहे.
तरीही ४१ टक्के घरांमध्ये चुलीवरच स्वयंपाक होतो. याचं कारण म्हणजे सिलिंडरचे न परवडणारे दर.
ग्रामीण भागात आजही लाकडं, गोवऱ्या आणि काटक्यांवर स्वयंपाकाला पसंती दिली जाते.
६३ टक्के घरांमध्ये एलपीजी किंवा नैसर्गिक वायू वापरला जातो. पाच टक्के घरांत ई-कुकिंग (इंडक्शन, कुकस्टोव्ह, राइस कुकर), तर एक टक्का घरांत रॉकेल वापरलं जातं.
अनेक घरांमध्ये गरजेनुसार विविध इंधनं वापरली जातात. संदर्भ : फिनशॉट्स