१ जुलैपासून पैशांशी संबंधित गोष्टींचे नियम बदलणार

जुलै महिन्यात आर्थिक बाबींसंदर्भात अनेक बदल होणार आहेत.

जुलै महिन्यात आर्थिक बाबींसंदर्भात अनेक बदल होणार आहेत. यात ट्रेनच्या तिकिटाच्या दरापासून ते एटीएममधून पैसे काढण्यापर्यंतच्या बदलांचा समावेश आहे.

१ जुलैपासून सामान्य माणसांसाठी ट्रेनचं तिकीट महाग होणार आहे. १ जुलैपासून नॉन-एसी डब्यांचं भाडं प्रति किलोमीटर १ पैसे आणि एसी डब्यांचं भाडं प्रति किलोमीटर २ पैसे वाढवलं जाऊ शकतं.

तिकीट एजंट्सना आळा घालण्यासाठी रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्येही बदल केले आहेत. १ जुलैपासून तत्काळ ट्रेन तिकीट बुकिंगसाठी वापरकर्त्यांना ओटीपीही द्यावा लागेल. 

एजंटसाठी तिकीट बुकिंग नियमांत बदल ट्रेनच्या तत्काळ तिकीट बुकिंगदरम्यान, एजंटना १ जुलैपासून पहिल्या अर्ध्या तासात बुकिंगला परवानगी दिली जाणार नाही. 

देशातील तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला स्वयंपाकाच्या गॅस आणि जेट इंधनाच्या किमतींमध्ये सुधारणा करतात. त्यामुळे, १ जुलै रोजी सिलिंडरच्या किमतीत काय बदल होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

१ जुलैपासून पॅन कार्डच्या नियमांमध्येही  बदल येणार आहे. पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य असेल. ज्यांच्याकडे हे दोन्ही कार्ड आधीच आहेत, त्यांना ते लिंक करणं अनिवार्य असेल. 

ICICI च्या ग्राहकांसाठी १ जुलैपासून एटीएममधून रोख काढणे महाग होणार आहे. मेट्रो शहरांत ३ विनामूल्य व्यवहार करता येतील. यानंतर आर्थिक व्यवहारांवर २३ रुपये, गैर-आर्थिक व्यवहारांवर ८.५ रुपये शुल्क लागेल. 

Click Here