सततचे वाद, भांडणे संपवायचीत... घरातून आजच बाहेर काढा 'या' ४ गोष्टी 

छोटा बदल, मोठा परिणाम! एकदा करून तर बघा...

फेंगशुई आणि घरातील ऊर्जा

वास्तुशास्त्राप्रमाणेच 'फेंगशुई' ही चिनी विद्या घरात ऊर्जेचा समतोल राखण्यावर भर देते. घरातील काही वस्तू नकारात्मकता वाढवतात.

घड्याळ हे प्रगती आणि काळाचे प्रतीक आहे. बंद घड्याळ आयुष्यातील अडथळे आणि थांबलेल्या प्रगतीचे संकेत देते. यामुळे घरात नकारात्मकता वाढते.

तडे गेलेली किंवा तुटलेली भांडी
फेंगशुईनुसार, तुटलेली भांडी घरात ठेवल्याने कुटुंबातील नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. जुनी आणि निकामी भांडी घराबाहेर काढणेच हिताचे असते.

फुटलेला आरसा किंवा काच
फुटलेला आरसा हा सर्वात अशुभ मानला जातो. यात साठलेली नकारात्मक ऊर्जा मानसिक तणाव आणि भांडणांना निमंत्रण देते.

फाटलेले चपला आणि जोडे
अनेकदा आपण जुने जोडे नंतर कामाला येतील म्हणून जपून ठेवतो. मात्र, असे फाटके जोडे घरातील ऊर्जेचा प्रवाह खंडित करतात आणि चिंतेत वाढ करतात.

ऊर्जेचा अडथळा का होतो?
घरात जमा झालेला तुटलेला-फुटलेला कचरा 'ची' म्हणजेच सकारात्मक ऊर्जेचा मार्ग रोखतो. यामुळे घरात विनाकारण कटकटी सुरू होतात.

सकारात्मक बदल कसा घडवाल?
घरातील अडगळ साफ केल्यावर सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे मनोबल वाढते आणि शांतता लाभते.

छोटा बदल, मोठा परिणाम!
आजच आपल्या घराची पाहणी करा आणि या चार गोष्टी बाहेर फेकून देऊन आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचे स्वागत करा!

Click Here