तुमचे पाय सांगतात तुमच्या लिव्हरचं आरोग्य...

लिव्हर डॅमेज किंवा फेल्युअर झाल्यास पायांवर काही खास लक्षणे दिसतात... 

लिव्हर डॅमेज किंवा फेल्युअर झाल्यास शरीरावर विविध लक्षणे दिसू शकतात, विशेषतः पायांवर काही खास लक्षणे दिसतात.

पायांना सूज येणे (Swelling/Edema): लिव्हर व्यवस्थित काम करत नसेल तर पाय, टाचा, अथवा पायांचा तळवा सुजतो. हे शरीरात द्रवाची अति साठवण आणि प्रोटीनची कमतरता यामुळे होते.

पायांना खाज येणे (Itchy Feet) : लिव्हरचे काही आजार (उदा. हेपॅटायटीस, सिरोसिस) असल्यास, पायांना किंवा हातांना तीव्र खाज येऊ शकते.

पाय दुखणे (Foot Pain):
 दिर्घकालीन लिव्हर डॅमेजमुळे शरीरात द्रव साठतो, त्यामुळे पाय दुखू शकतात, विशेष करून चालनात त्रास होतो.

पाय बधीर/झिणझिणीत होणे (Numbness/Tingling):
लिव्हरच्या आजारामुळे कधी कधी पायात बधीरपणा किंवा झिणझिणी जाणवते (Peripheral Neuropathy).

पायावर लाल/तपकिरी ठिपके, स्पायडर वेन्स :
लिव्हर रक्त गोठवण्यासाठी आवश्यक प्रोटीन्स तयार करत नाही, त्यामुळे पायावर लाल, तपकिरी ठिपके किंवा स्पायडर वेन्स दिसतात.

पायांचा रंग किंवा त्वचेची पिवळसरता :
 लिव्हर खराब झाल्याने बिलीरुबिन साठते व पायांची त्वचा किंवा नखांचा रंग पिवळा वाटू लागतो.

वरील लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही लक्षणे अन्य आजारांमध्येही दिसू शकतात, मात्र लिव्हरच्या आजाराची शंका येण्यास पुरेसे आहेत.

Click Here