निरोगी राहण्यासाठी शरीर एक्टिव्ह असणं खूप महत्वाचं असतं. ज्याप्रमाणे शरीर एनर्जेटीक राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे वॉक आणि व्यायामाचीही आवश्यकता असते.
सकाळी वॉक केल्यानं ताणतणाव दूर होतो आणि शरीरात ब्लड सर्क्युलेशनही चांगले होतं. मात्र, मॉर्निंग वॉक करताना काही चुका केल्यामुळे तुमचे आरोग्यही बिघडू शकते.
मॉर्निंग वॉक केल्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात हे पाहुयात.
सकाळी वॉक करून आल्यानंतर पोटभर पाणी प्या. असं केल्यानं शरीरात डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही. शरीराला थकवा येत नाही. म्हणून वॉक करून आल्यानंतर भरपूर पाणी प्यायला हवं.
सकाळच्या वॉकनंतर आवर्जून स्ट्रेचिंग करायला हवं. मॉर्निंग वॉक केल्याने आपल्या मांसपेशी गरम होतात. अशा स्थितीत मांसपेशींमध्ये वेदना वाढू शकतात. म्हणून, स्ट्रेचिंग करावं. यामुळे वेदनांपासून सुटका मिळते.
चालून आल्यानंतर शरीर शांत, थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण चालण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. म्हणून वॉकनंतर काहीवेळ शांत बसायला हवं. जेणेकरून हार्ट बीट नॉर्मल होतील.
अधिक वॉक केल्याने ऊर्जा कमी होते अशावेळी फळांचे सेवन केल्यानं शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.