आषाढी एकदशीनिमित्त पंढरपूरला जात असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेलात तर चंद्रभागा नदीच्या पलीकडे इस्कॉन मंदिर आहे. तिथे भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली असते
गोपाळपूर हे असंच एक ठिकाण. पंढरपूरपासून फक्त तासाभराच्या अंतरावर हे ठिकाण आहे. इथे श्रीकृष्णाच्या पावलांचे ठसे आहेत
चंद्रभागा नदी हे पंढरपूर मंदिराजवळ असलेलं आणखी एक ठिकाण. गेली अनेक वर्ष ही नदी वारकऱ्यांच्या वारी प्रवासाची साक्षीदार आहे
संत कैकाडी महाराजांचा मठ हे पंढरपूरजवळ असलेलं आणखी एक ठिकाण. इथे भलीमोठी इमारत असून तिथे गेल्यावर तुम्हाला ३३ कोटी देवतांचं दर्शन झाल्याचा आनंद मिळतो
पंढरपूर मंदिराजवळ अगदी हाकेच्या अंतरावर शेगाव संस्थानचा गजानन महाराजांचा मठ आहे. इथे भाविकांच्या राहण्याची, जेवणाची अगदी अल्पदरात सोय केली जाते
पंढरपूर मंदिरापासून ५ किमी अंतरावर कुरवली म्हणून गाव आहे. तिथे असलेलं दत्त मंदिर खूप प्रसिद्ध आहे