चष्मा साफ करतांना करु नका चूका; नजरेवर होईल परिणाम

दृष्टीदोषामुळे चष्मा वापरणं गरजेचं असतं. त्यामुळे त्याची तितकी काळजीही घ्यावी लागते.

आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांमध्ये दृष्टीदोष असल्याचं दिसून येतं. परिणामी, आज बरेच जण चष्मा घालून वावरतांना दिसतात.

दृष्टीदोषामुळे चष्मा वापरणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे त्याची तितकी काळजीही घ्यावी लागते.

अनेकदा आपण चष्मा साफ करतांना योग्य ती काळजी घेत नाही. ज्याचा परिणाम आपल्याच डोळ्यांवर होतो.

चष्म्यावर धूळ जमा झाली तर लगेचच आपण ती आपल्या कपड्यांना पुसतो. परंतु, तसं करु नका. यामुळे चष्म्याच्या काचांची गुणवत्ता खालावते. काचेवर ओरखडे पडू शकतात.

चष्मा कधीही डॉक्टांनी दिलेल्या ग्लास क्लिनर लिक्विडनेच पुसला पाहिजे. कधीही चष्म्याला साबण किंवा डिटर्जंट लावू नका. साबण, डिटर्जंटने चष्मा धुतल्यामुळे लेन्सच्या आवरणाचे नुकसान होऊ शकते. 

चष्मा पुसतांना तो मायक्रोफायबर कापडानेच पुसा. (शक्यतो चष्मा खरेदी केल्यावर त्याच्यासोबत जो लहानसा रुमाल येतो.)

चष्मा डोळ्यावरुन उतरवतांना दोन्ही हातांन उतरवा. ज्यामुळे त्याच्या फ्रेम एकाच बाजूने वाकणार नाही.

पचनक्रिया वाढवणारे ५ सूप, नक्की ट्राय करा या रेसिपी

Click Here