भुवया आणि पापण्यांचे केस दाट करण्यासाठी तयार करा होममेड सिरम
अनेक स्त्रिया आणि पुरुषांमध्ये भुवया किंवा पापण्या पातळ होण्याची समस्या असते.
यात अनेक जण वेगवेगळी ब्युटी प्रोडक्ट वापरुन भुवयांचे केस दाट करायचा प्रयत्न करतात. परंतु, यात फारसा फरक पडत नाही. म्हणूनच, भुवया व पापण्यांचे केस दाट करण्याचे घरगुती उपाय पाहुया.
भुवया आणि पापण्यांचे केस नैसर्गिकरित्या दाट करण्यासाठी घरीच मोजक्या साहित्यात एक सिरम करता येतं. हे सिरम अत्यंत फायदेशीर ठरतं.
हे सिरम तयार करण्यासाठी कॅस्टर ऑइल १ चमचा, नारळाचं तेल १ चमचा, व्हिटॅमिन कॅप्सूल १, कोरफड रस अर्धा चमचा हे साहित्य लागेल.
वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करुन एका बाटलीमध्ये भरुन ठेवा. हे सिरम थोडंसं गुळगुळीत होतं.
रात्री झोपण्यापूर्वी हे सिरम दररोज भुवया आणि पापण्यांवर हलक्या हाताने लावा. लक्षात ठेवा हे सिरम डोळ्यात जाऊ देऊ नका.
या सिरममुळे भुवया, पापण्यांचे केस मजबूत होतात. तसंच त्यात ओलावा टिकून राहतो. इतकंच नाही तर केस गळतीची समस्याही दूर होते. ही सिरम साधारणपणे महिनाभर दररोज लावा.