अनेकजण दिवसभर मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात.
सध्याच्या काळात मोबाईल म्हणजे लोकांसाठी अत्यावश्यक गोष्टींपैकी एक झाली आहे.
मोबाईलच्या सतत वापरामुळे नेमका डोळ्यांवर काय परिणाम होते ते पाहुयात.
ड्राय आय सिंड्रोम- मोबाईल पाहिल्यांमुळे पापण्यांची सतत उघड-झाप होत असते त्यामुळे डोळ्यातील ओलावा कमी होतो.
डोळ्यात कोरडेपणा आल्यामुळे डोळे दुखायला लागतात. काही वेळा डोळ्यांचा रंग लाल व्हायला लागतो.
डिजीटल आय स्ट्रेन - बराच काळ मोबाईल पाहिल्यामुळे डोळ्यांची जळजळ, डोळे जड वाटणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.काही वेळा अस्पष्टही दिसू लागते.
ब्लू लाइट डॅमेज- मोबाईमधून निघणाऱ्या ब्लू लाईट थेट डोळ्यांच्या रेटिनावर पडतो. ज्यामुळे डोळ्यांमधील नसा हळूहळू कमकूवत होऊ लागतात.