डाेळ्यांचे आराेग्य चांगले राहण्यासाठी डाेळ्यांवरचा ताण नियमितपणे कमी राहिला पाहिजे. तुमच्या डाेळ्यांसाठी दिवसातून फक्त ५ मिनिटे वेळ द्या.
स्क्रीनकडे पाहून सतत काम करत राहिल्याने डाेळे जळजळणे, लाल हाेणे, काेरडे पडणे, ताण वाढणे या समस्या काॅमन झाल्या आहेत.
Plaming - डाेळे मिटून तळहाताने डाेळे झाकून शांत बसणे. यामुळे डाेळ्यांना विश्रांती मिळते. काम सुरू असताना थाेड्या वेळासाठी ही क्रिया करावी.
ब्लिंकिंग - खूप वेळ सतत स्क्रीनकडे पाहिल्यानंतर १० सेकंदासाठी डाेळ्यांची उघड झाप करायची. यामुळे डाेळ्यांना आराम मिळताे.
फाेकस शिफ्ट - स्क्रीन डाेळ्यांच्या जवळ असते. त्यामुळे सतत एकाच ठिकाणी पाहण्यापेक्षा थाेडा वेळाने दूरच्या गाेष्टी पाहाव्यात. झाडाकडे पाहावे.
Eye Rotation - एकाच ठिकाणी जास्त काळ पाहिल्यानंतर डाेळे वर्तुळाकार फिरवावेत. डाेळ्यांच्या कडेला पाहावे.
२० - २० - २० रूल - २० मिनिटांनी २० सेकंदासाठी २० फूट लांब कुठेतरी पाहावे. यामुळे डाेळ्यांना आराम मिळेल.
या याेगक्रिया राेजच्या राेज प्रॅक्टिस केल्याने डाेळ्याचे आराेग्य चांगले राहते. डाेळ्यांचा आराेग्य सुधारण्यासाठी राेज ५ मिनिटे काढा.