शॅम्पू आणि कंडिशनरविषयी या गोष्ट तुम्हाला माहित नसतील
कोणतेही मेकअप प्रोडक्ट घेतांना आपण कायम त्याची एक्सपायरी डेट पाहूनच त्या वस्तूची खरेदी करतो.
अनेकदा आपण प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट पाहतो. परंतु, शॅम्पू आणि कंडिशनरच्या एक्सपायरी डेटकडे फारसं कोणाचं लक्ष जात नाही.
ब्युटी एक्सपर्ट शहनाज हुसेन यांनी शॅम्पू, कंडिशनरच्या वापराविषयी, त्याच्या एक्सपायरीविषयी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
शॅम्पू आणि कंडिशनर हे ब्युटी प्रोडक्टप्रमाणेच असतात. त्यामुळे त्याच्यातही ब्युटी प्रोडक्टप्रमाणेच काही घटक आणि प्रिझर्व्हेटिव्हचा वापर केला असतो.
शॅम्पू आणि कंडिशनरमध्ये वापरण्यात येणारे घटक काही काळानंतर खराब होऊ लागतात. ज्यामुळे केसांना नुकसान पोहचू शकतं.