सतत हेडफोन वापरताय? कानावर होतात गंभीर परिणाम

हेडफोन्स वापरल्यामुळे फोनवर बोलणं सोप्पं झालं असलं तरीदेखील त्याचे दुष्परिणामही तितकेच आहेत

आजकाल प्रत्येकाच्या कानात सर्रास हेडफोन्स पाहायला मिळतात.

हेडफोन्स वापरल्यामुळे फोनवर बोलणं किंवा गाणी ऐकून मनोरंजन करणं कितीही सोप्पं झालं असलं तरीदेखील त्याचे दुष्परिणामही तितकेच आहेत.

हेडफोन्समध्ये सतत गाणी ऐकल्यामुळे त्याचा परिणाम कानांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर होतो. यामुळे बहिरेपणा, कानात इन्फेक्शनदेखील होऊ शकतं.

सतत हेडफोन्स लावल्यामुळे कानदुखीची समस्या होऊ शकते. तसंच मेंदूवरही त्याचा परिणाम होतो. हेडफोन इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी निर्माण करतात. त्यामुळे त्याचा दीर्घकाळ वापर केल्यास मेंदूवर वाईट परिणाम होतो.

तासनतास इयरफोन किंवा हेडफोन वापरल्याने कानात मळ साठू शकतो. त्यामुळे कानात इंन्फेक्शन, ऐकण्याची क्षमता कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

अनेकदा लोक हेडफोन इतरांबरोबर शेअर करतात. पण यामुळे इअरफोनच्या मार्फत बॅक्टेरिया, जंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या कानापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे कानाला संसर्ग होण्याचा धोका वाढतो. 

पोटऱ्यांमध्ये गोळे येतायेत? करा सोपे उपाय

Click Here