परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी करा अशी तयारी, पेपर जाईल एकदम सोपा

परीक्षा म्हटलं की अनेकांच्या पोटात भितीने गोळा येतो.

वर्षभर कितीही अभ्यास झाला असला तरीदेखील ज्यावेळी परिक्षेचा दिवस येतो त्यावेळी पोटात गोळा येतोच येतो.

परिक्षेला जाण्यापूर्वी काही बेसिक गोष्टींची पूर्वतयारी केली तर नक्कीच तुमचा पेपर सोपा जाईल आणि निकालही चांगलाच लागेल.

परिक्षेला जाण्यापूर्वी काही नोट्स शॉर्टलिस्ट करा. उदा. काही सूत्र, फॉर्म्युला हे हायलाइट्स करुन ठेवा. म्हणजे परिक्षेला जाण्यापूर्वी एकदा त्याच्यावर नजर मारली की लक्षात रहायला सोपं जाईल.

एखादा टॉपिक किंवा धडा खूप मोठा असतो त्यामुळे त्याचा सारांश तुमच्या भाषेत तयार करा. म्हणजे पाठांतर सोप्या पद्धतीने होईल.

पेपरला जाण्यापूर्वी मनावर कितीही दडपण असलं तरी सुद्धा पेपर 'सोपाच जाणार आहे', हे सतत मनाला समजवा.

मन जितकं शांत ठेवता येईल तितकं ठेवा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल किंवा पेपर कठीण असेल तर ५ मिनिटे डोळे बंद करा.आणि, शांत मनाने झालेल्या अभ्यासाची मनात एकदा उजळणी करा.

मुलांसाठी कूल फॅशन टिप्स,ट्राय करा हे प्रिंटेड शर्टस्

Click Here