पाणी पिण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या वापरल्या जातात. पण, पाणी पिण्यासाठी तुम्ही या बाटलीचा वापर तर करत नाही ना?
पाणी पिण्यासाठी काेणत्या प्रकारच्या बाटल्या याेग्य आहेत, हे ९० टक्के लाेकांना माहितच नसते. या प्रकारच्या बाटल्या वापरणे याेग्य आहे.
पाणी पिण्यासाठी काही लाेक काचेच्या, प्लॅस्टिकच्या, तांब्याच्या, मातीच्या, स्टिल किंवा फायबरच्या बाटल्यांचा उपयाेग केला जाताे.
भारतात अनेकजण उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी मातीच्या किंवा तांब्याच्या बाटलीचा वापर जास्त प्रमाणात केला जाताे.
दिवसभर पाणी भरून ठेवून काेणत्या बाटलीतून पाणी पिणे याेग्य आहे, हे आज आपण पाहू या.
तांब्याच्या बाटलीतून पाणी पिण्याचे फायदे अनेक आहेत. पण, ही बाटली राेज स्वच्छ घासणे आवश्यक आहे.
काचेच्या बाटलीत पाणी ठेवून पिणे चांगले आहे. काचेत काेणत्याही प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया हाेत नाहीत.
पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकची बाटली वापरणे हे धाेकादायक आहे. प्लॅस्टिक बाटली मध्ये पाणी ठेवल्यास पाण्यात रसायन मिसळू शकतात.
राेज पाणी पिण्यासाठी काच, माती आणि स्टीलची बाटली वापरणे अधिक चांगले समजले जाते.