डिजिटल डिटाॅक्स कसा करता येताे???

माेबाईल, टीव्ही, लॅपटाॅप अशा विविध स्क्रीन सातत्याने समाेर असतात. दिवसभरात स्क्रीनपासून लांब राहणे यालाच डिजिटल डिटाॅक्स म्हणतात. 

जास्त स्क्रीन टाइममुळे ताण वाढताे. चिडचिड हाेते, थकवा येताे. डिजिटल डिटाॅक्स केल्यावर या गाेष्टी कमी हाेऊन मनं शांत राहाते.

सतत माेबाईल बघण्याची इच्छा हाेते, इतरांशी संवाद कमी हाेताे, झाेपेत अडचणी येतात, असे हाेत असेल तर तुम्हाला डिजिटल डिटाॅक्सची गरज आहे. 

डिजिटल डिटाॅक्स करायची सुरूवात करायची असेल, तर सुरूवातीला दिवसातून १० ते १५ मिनिटे माेबाईलपासून लांब रहा. 

पुढच्या काही दिवसांत माेबाईल न पाहण्याचा, स्क्रीन टाइम टाळण्याचा वेळ वाढवत नेऊन १ ते २ तासांवर न्या. 

जेवताना, बेडरूममध्ये, एकत्र गप्पा मारताना माेबाईल पाहणे, वापरणे टाळा. घरात एकवेळ ठरवून सगळ्यांनी स्क्रीन बंद ठेवा. 

स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःशी संवाद साधा. माेकळ्या हवेत फिरायला जा. वेगवेगळी पुस्तकं वाचा. 

रविवारी सुटीच्या दिवशी डिजिटल उपवास करा. मनाला एक प्रकारची शांतात मिळेल. मन आनंदी राहिल्यास तब्येत चांगली राहते. 

डिजिटल डिटाॅक्स केल्याने एकाग्रता वाढते. संवाद वाढताे, नातेसंबंध सुधारतात. मानसिक समाधान मिळते. 

तुम्ही डिजिटल डिटाॅक्ससाठी छाेटा ब्रेक घेतला. तर, त्याचा माेठा परिणाम हाेताे. तुमच्या आयुष्यातला ताे वेळ एक नवी उर्जा तुम्हाला देताे. 

Click Here