पाॅझिटिव्ह सकाळ हाेण्यासाठी 'हा' मंत्र 

प्रत्येक दिवसाची सुरुवात शुद्ध विचारांनी आणि सकारात्मक उर्जेने व्हावी म्हणून हा मंत्र म्हणतात. आठवताेय का हा मंत्र? 

बालपणीपासून संस्कार म्हणून शिकवला जातो. आयुष्यभर हा मंत्र सकारात्मक परिणाम आपल्यावर करत राहताे. 

हा मंत्र आहे,
'कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती।करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम्॥'

कराग्रे म्हणजे हातांच्या अग्रभागी. या भागात लक्ष्मीचा वास आहे,  असं मानतात. हे धन, समृद्धीचं प्रतीक आहे.

'करमध्ये' म्हणजे हाताच्या मधोमध सरस्वती वसते. सरस्वती ज्ञान, बुद्धी आणि विद्या यांचं रूप आहे. 

'करमूले' म्हणजे हाताच्या मुळाशी म्हणजे मनगटाजवळचा भाग. भगवान विष्णू – पालनकर्ता, जीवनाचा आधार इथे वसताे. 

हातातच लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंद असल्याचं स्मरण करून स्वतःवर विश्वास निर्माण करणे.

हातांमध्ये खूप ताकद असते. यामुळे सकाळी उठल्यावर काेणत्याही कामाची सुरूवात करण्याआधी या करांचे दर्शन घ्यावे. 

Click Here