डाॅल्फिन हा जगातील बुद्धिमान प्राण्यांपैकी एक आहे. डाॅल्फिनचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्वतःची एक भाषा असते.
डाॅल्फिन एक दुसऱ्यांशी खास शैलीत संवाद साधतात. डाॅल्फिन स्वतः एक भाषा तयार करून त्याचा वापर करतात.
डाॅल्फिन्स एकमेकांशी क्लिक, व्हिसल्स आणि बाॅडी मुव्हमेंट्सचा वापर करून बाेलतात. ही त्यांची खास कम्युनिकेशन सिस्टीम आहे.
प्रत्येक डाॅल्फिनकडे स्वतःचा सिग्नेचर व्हिसल असताे. ही व्हिसल म्हणजेच त्या डाॅल्फिनच नावं. इतर डाॅल्फिन्स त्याला या नावाने ओळखतात.
आई डाॅल्फिन पिल्लू जन्माला आल्यानंतर लगेच त्याला व्हिसल नाव शिकवते, असे एका संशाेधनात आढळून आले आहे.
डाॅल्फिन्स इकाेलाेकेशन वापरतात. पाण्यातून येणाऱ्या आवाजाच्या तरंगावरून डाॅल्फिनना पाण्यातील वस्तूंचे स्थानं कळतं.
डाॅल्फिनचा मेंदू खूप विकसित असल्यामुळे ते विचार करू शकतात, आठवणी ठेवतात आणि गुंतागुंतीची भाषा वापरतात, असे शास्त्रज्ञ सांगतात.
दाेन डाॅल्फिन्स एकमेकांशी संवाद साधताना थांबवतात, त्यांच्या संभाषणात शिस्त असते, असे २०१६ मध्ये झालेल्या प्रयाेगात आढळून आले.
काही संशाेधकांच्या मते, मानवी भाषेसारखी डाॅल्फिन्सची भाषा जटिल असते. पण, अजून पूर्णपणे उलगडलेली नाही.