रात्री झाेपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून झाेपल्याने काय फायदे हाेतात? हे तुम्हाला माहिती आहे का?
राेज रात्री झाेपण्यापूर्वी दात घासण्याचे जसे फायदे आहेत, त्यापेक्षा जास्त फायदे पाय धुवून झाेपण्याचे आहेत.
राेज रात्री झाेपण्यापूर्वी पाय धुवून स्वच्छ करण्याची सवय आजपासून तुम्ही स्वतःला लावून घ्या, आणि त्याचे फायदे नक्की अनुभवा.
आर्युवेदात पाय म्हणजे शरीराचे मूळ आहे असे मानले जाते. दिवसभरात शरीरातील उष्णता, थकवा हा पायात साठून राहताे.
दिवसभर आपण उभे असताे, बाहेर फिरताे, त्यावेळी कितीही काळजी घेतली तरी बाहेरची धूळ, घाण ही पायांना लागलेली असते.
रात्री झाेपण्यापूर्वी पाय धुतल्याने शरीर थंड हाेण्यास मदत हाेते. पाय स्वच्छ धुतल्याने शरीराला आराम मिळताे.
राेज रात्री पाय धुतल्याने पित्त कमी हाेण्यास मदत हाेते. पाय स्वच्छ धुतल्यामुळे छान झाेप लागते.
काेमट पाण्याने पाय धुतल्यास पायाच्या नसा रिलॅक्स हाेतात. त्यामुळे दिवसभराचा ताण कमी हाेण्यास मदत हाेते.