राेजच्या कामाच्या गडबडीत कमी पाणी प्यायल जातं का? कमी पाणी पित असाल, तर मग शरीरात काय होतं? हे नक्की वाचा.
शरीरात सुमारे ६०% पाणी असतं. शरीरात पाणी कमी झाल्यास सर्व अवयवांवर त्याचा परिणाम होतो.
मेंदूला पाणी कमी मिळालं तर स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते.
हृदयावर जास्त ताण येतो, रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे धडधडणं अनियमित होते.
पाणी कमी प्यायल्याने त्वचा कोरडी हाेते. त्वचेचा तजेलदारपणा कमी हाेताे आणि वृद्धत्व लवकर जाणवू लागते.
मांसपेशींना क्रॅम्प्स येऊ शकतात आणि स्नायूंमधली शक्ती कमी झाल्याचे जाणवायला लागते.
पचनसंस्था प्रभावित होते, बद्धकोष्ठता, अपचन हाेते. पचनासंबंधीच्या समस्या वाढल्याने आराेग्यावर परिणाम हाेताे.
शरीरातील पाणी कमी झाल्यास रक्त थर थोडा घट्ट होतो. शरीराला ऑक्सिजन पोहोचवणं कठीण होतं.
अत्यंत कमी पाण्याने किडनी स्टोन्स, मूत्रमार्गाचे इन्फेक्शन आणि इतर आजारांचा धोका वाढतो.
दररोज पुरेसं पाणी प्यायला हवं. साधा नियम, दररोज किमान ८ ग्लास पाणी शरीर निरोगी ठेवायला महत्त्वाचं आहे.