वाहत्या धबधब्यात आग जळत राहाते. पाण्याचा प्रवाह असूनही आग विझत नाही, असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण, असं एक ठिकाण आहे.
अमेरिकेत न्यूयाॅर्क इथे एका धबधब्यामागे सातत्याने आगीचा लाेळ पेटत असताे. Eternal Flame Falls असं या जागेच नावं आहे.
इटर्नल फ्लेम फाॅल्सच्या आतल्या बाजूला जमिनीतून मिथेन गॅसची नैसर्गिकरित्या गळती हाेत असते. यामुळे या ठिकाणी सातत्याने आग पेटती राहते.
जगात दुसरीकडे कुठेच धबधब्याच्या मागे आग आढळून येत नाही. न्यूयाॅर्कमधील इटर्नल फ्लेम हे जगातील एकमेव ठिकाण आहे.
मिथेन गॅस गळती, पाण्यात ज्वाळांचा टिकाव कसा लागताे यावर अजूनही संशाेधक संशाेधन करत आहेत.
अगम्य निसर्ग, गूढता, निसर्ग साैंदर्याने नटलेलं या ठिकाणी लाेक आर्वजून भेट देतात. एक वेगळा अनुभव इथे घेता येताे.
निसर्गाचा चमत्कार अनुभवण्यासाठी पर्यटक खास करून इथे जातात. फाेटाे काढण्यासाठी अनेकजण तिथे भेट देतात.
पावसाळ्यात किंवा जाेराचा वारा आल्यावर कधी - कधी ही आग विझते. येथील स्थानिक लाेक किंवा पर्यटक ती आग परत पेटवतात. पुन्हा ती तिथे धगधगत राहाते.