पाऊस म्हणजे भजी, वडा, चहा, भिजायला जाणं एन्जाॅय करताे. पण, आजारपण नकाे असेल, तर असा पावसाळा एन्जाॅय करा
पावसाळ्यात बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, बाहेर खाताना जागा, तिकडची स्वच्छता या गाेष्टी पहा.
गरमागरम भजी खायची इच्छा झाल्यास, थाेडे कष्ट घ्या, पण घरीच भजी करायला ट्राय करा.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी दुषित असते. बाहेर जाताना पाण्याच्या बाटल्या बराेबर ठेवा.
तहान कमी लागत असल्याने पाणी कमी प्यायले जाते. याचा शरीरावर परिणाम हाेताे, पावसाळ्यातही हायड्रेट रहा.
पावसाळ्यात हात स्वच्छ ठेवा, जेवणाआधी, जेवणानंतर हात स्वच्छ साबणाने धुवा.
शिळे अन्न खाणे टाळा. शिळ्या अन्नामुळे पचनाचा त्रास, उलट्या, जुलाब हाेण्याचा धाेका वाढताे.
बाहेरून घरी आल्यावर पाय स्वच्छ धुवा, काेरडे करा. नियमित असे केल्याने तुम्ही आजारी पडणार नाही.