घरातल्या पदार्थांपासून बनवा सलाड्स 

काहीतरी चटपटीत पण हेल्दी खाण्याची इच्छा आहे. तर, मग नक्कीच हे सलाड्स तुम्ही ट्राय करा. घरातल्या पदार्थांपासून उत्तम सलाड्स तुम्ही बनवू शकता. 

प्राेटीनयुक्त सलाड्साठी मूगडाळ २ ते ३ तास भिजवून ठेवा. भिजवलेल्या मूगडाळीत दही, मिरपूड, मीठ घाला. पाैष्टिक करण्यासाठी गाजर घालू शकता. 

मुळ्याचं सलाड. मुळा खिसून पाणी काढून घ्या. भिजवलेली मूग डाळ, लिंबू रस, साखर, मीठ घाला. वरून खमंग जिरं, माेहरीची फाेडणी घाला. 

छाेले उकडून घ्या. त्यात बारीक कांदा, टाॅमेटाे चिरून घाला. सगळं एकत्र करून लिंबू पिळून, चाट मसाला घाला. चवही उत्तम, पाेटही भरत. 

काकडी किसून घ्या पाणी काढून घ्या. त्यात दही, मीठ, मिरपूड, सारख घाला. डाळिंबाचे दाणे घालू शकता. पावसाळ्यात पचायलाही हलकं आहे. 

माेड आलेले मूग, किसलेलं गाजर एकत्र करा, त्यावर लिंबू रस, मिरपूड, मीठ घालून एकत्र करा. रंग, चव आणि पाेषणासाठी उत्तम पर्याय आहे. 

उकडलेले बटाटे चिरून घ्या. त्यात कांदा, टाॅमेटाे घाला. वरून चाट मसाला, लिंबू रस, मीठ, साखर घाला. पाेटभर आणि उत्तम चवीच खायला मिळेल. 

उकडलेले मक्याचे दाणे, किसलेले गाजर, टाॅमेटाे एकत्र करून घ्या. त्यावर चाट मसाला, लिंबू रस, चवीपुरते मीठ घाला. 

Click Here