गिलची विराटच्या खास क्लबमध्ये एन्ट्री
इंग्लंडच्या मैदानात कसोटी संघाचे नेतृत्व करताना पहिल्याच सामन्यातील पहिल्या डावात शुबमन गिलनं शतकी खेळीसह खास छाप सोडली आहे.
भारतीय संघाचे नेतृत्व करताना इंग्लंडच्या मैदानात सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत त्याने गांगुलीला मागे टाकले आहे.
इथं एक नजर टाकुयात भारतीय संघाचे नेतृत्व करताना इंग्लंडच्या मैदानात सर्वाच्च वैयक्तिक धावसंख्येच्या खास रेकॉर्डवर
मोहम्मद अझरुद्दीन या यादीत अव्वलस्थानी आहे. १९९० मध्ये मँचेस्टरच्या मैदानात त्याने संघाचे नेतृत्व करताना १७९ धावांची खेळी केली होती.
विराट कोहलीनं २०१८ मध्ये बर्मिंघम कसोटी सामन्यात कॅप्टन्सीत १४९ धावांची खेळी केली होती.
मन्सूर अली पतौडी या यादीत १४८ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. १९६७ मध्ये लीड्सच्या मैदानात त्यांनी ही कामगिरी केली होती.
शुबमन गिल १४७ धावांच्या खेळीसह इंग्लंडच्या मैदानात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा चौथा भारतीय कॅप्टन ठरलाय.
या यादीत सौरव गांगुली आता १२८ धावांसह पाचव्या स्थानावर आहे. २०२ मध्ये लीड्सच्या मैदानात त्याने ही खेळी साकारली होती.