'आंखों ही आंखों में...' गिल-जड्डूचा तो व्हिडिओ होतोय व्हायरल

बर्मिंगहॅमच्या मैदानात या जोडीनं लुटली मैफिल

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. 

पहिल्यांदा फलंदाजी करताना अर्धा संघ तंबूत परतल्यावर कर्णधार शुबमन गिल आणि रवींद्र जडेजा जोडीनं ९९ धावांची दमदार भागीदारी रचली.

एजबेस्टनच्या मैदानात कोणत्याही भारतीय जोडीनं केलेली ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. 

दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार शुबमन गिलनं पुन्हा एकदा आपला क्लास दाखवला.

रवींद्र जडेजानंही कॅप्टनला सर्वोत्तम साध देत बर्मिंगहॅमच्या मैदानात दमदार बॅटिंग केली.

चोरटी धाव घेतल्यावर गिल-जड्डू यांच्यात "आंखों ही आंखों में हाहा! आपके साथ मैं हूं." या खास संवादाचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत  एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ गिल- जड्डू जोडीतील कमालीचा ताळमेळ दाखवून देणारा आहे.

Click Here