Emotional Baggage कमी केल्याचे फायदे !

आयुष्यात अनेकजण आजच्या दिवसाचा आनंद घेऊ शकत नाही. Emotional Baggage उतरवल्यास त्याचे नक्कीच फायदे आहेत. 

भावना व्यक्त करत नाही, दुःख पचवता येत नाही, एखाद्याला माफ करता येत नाही. हळूहळू Emotional Baggage च ओझं वाढत जात. 

घडून गेलेली घटना सातत्याने आठवते, त्याचा त्रास हाेताे. घटना आपल्यामध्ये ती जिवंत असते. आजचा दिवस आनंदाने जगायला अडथळा निर्माण करते. 

भावनात्मक ओझं उतरवून ठेवण्यासाठी सर्वात आधी त्या भावनांचा स्वीकार करा. भावना इतके दिवस नाकारल्याने त्या तशाच तुमच्या आत राहिल्या आहेत. 

माफ करायला शिका. माफ केल्याने तुमचं ओझं कमी हाेणार आहे, तुमची पुढची वाटचाल सकारात्मक हाेणार आहे, यात तुमचाच फायदा आहे. 

स्वतःच्या चुकांमधून शिका. चुकांचा दाेष स्वतःवर घेत राहिलात तर त्याचा उपयाेग हाेत नाही. चुकांमधून शिकलात तर ताे अनुभव हाेताे. 

आधीच्या भावनांचं ओझं उतरवलंत तर तुम्हाला नवीन दृष्टिकाेन मिळताे. आयुष्यात नवे अनुभव घ्यायला तुम्ही सज्ज हाेता. 

तुमच्या भावनांचा गुंता वाढत असेल, तर त्या कागदावर लिहायला सुरूवात करा. अनेकदा लिहीताना नव्याने भावना कळतात. 

भावनात्मक ओझं घेऊन पुढे जाताना स्वतःवरचा विश्वास कमी हाेताे. नवीन नातेसंबंध तयार हाेताना विश्वास राहात नाही. 

स्वतःचे आयुष्य आनंदी करण्यासाठी भावनात्मक ओझं आजच उतरवायला सुरूवात करा. आनंदी आयुष्य जगा.

Click Here