Starlink चा मार्ग मोकळा, सरकारची परवानगी

इलॉन मस्क यांच्या Starlink ला सरकारकडून परवानगी मिळाली आहे.

भारतातील इंटरनेट क्रांती एका नवीन वळणावर आहे. इलॉन मस्क यांच्या Starlink ला भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळाली आहे. 

ही मान्यता भारतीय अंतराळ नियामक प्राधिकरण, म्हणजेच अंतराळ विभागाकडून मिळाली आहे. ही स्टारलिंकसाठी भारतात ऑपरेशन्स सुरू करण्याची शेवटची प्रक्रिया होती.

स्टारलिंक हा इलॉन मस्क यांच्या अंतराळ तंत्रज्ञान कंपनी SpaceXचा प्रकल्प आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात उपग्रहाद्वारे जलद इंटरनेट प्रदान करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. 

२०२२ पासून स्टारलिंक परवान्याची वाट पाहत होती. गेल्या महिन्यात, दूरसंचार विभागाकडून आवश्यक परवाना मिळाला होता. आता अंतराळ विभागाकडूनही मंजुरी मिळाली आहे.

आतापर्यंत दोन मोठ्या कंपन्यांना भारतात उपग्रह इंटरनेटसाठी मंजुरी मिळाली आहे. युटेलसॅट्स वनवेब, रिलायन्स जिओ सॅटेलाइट कम्युनिकेशन्स, ही मुकेश अंबानी यांची कंपनी आहे. 

स्टारलिंक आता भारतात काम करण्याची परवानगी मिळवणारी तिसरी परदेशी कंपनी बनली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर स्टारलिंकला आता स्पेक्ट्रम (फ्रिक्वेन्सी बँड) घ्यावे लागतील. 

भारतातील ज्या दुर्गम गावांमध्ये, डोंगराळ आणि सीमावर्ती भागात आजही इंटरनेट पोहोचलेले नाही, तिथे स्टारलिंक इंटरनेट प्रदान करेल. यामुळे डिजिटल इंडिया मिशनला चालना मिळेल.

स्टारलिंकच्या प्रवेशामुळे भारतातील इंटरनेटचे भविष्य आणखी मजबूत होणार आहे. इलॉन मस्कची हाय-टेक सेवा शहरांसह गावांनाही जलद इंटरनेट प्रदान करण्यात मोठी भूमिका बजावेल. 

Click Here