हत्तींबद्दलच्या या भन्नाट गोष्टी माहिती आहेत का? 

हत्तीच्या साईजप्रमाणं त्याच्या युनिक गोष्टी देखील मोठ्या आहेत.

हत्ती हा या पृथ्वीतलावरील ज्ञात प्राण्यांपैकी सर्वात मोठा प्राणी आहे. त्याच्या साईजप्रमाणं त्याच्या युनिक गोष्टी देखील मोठ्या आहेत.

हत्ती हा संपूर्ण दिवस खात असतो. तो दिवसातील जवळपास १६ तास खाऊ शकतात. दिवसातून ते शंभर ते अडीचशे किलो अन्न खातात. 

हत्ती अन्न चांगल्या प्रकारे पचवू शकत नाहीत. दिवसात खाल्लेलं फक्त निम्म्यापेक्षा कमी अन्न ते पचवू शकतात. 

जर योग्य उपकरणं असतील तर हत्तीच्या वेस्टमधून एवढं मिथेन तयार होतं ज्यातून एक कार २० ते २५ किलोमीटर आरामात जाऊ शकेल. 

हत्ती दिवसात १०० ते २०० लीटर पाणी पितो. हत्ती आपल्या सोंडेत जवळपास १० लिटर पाणी साठवून ठेवू शकतो. 

नर आशियाई हत्तींनाच फक्त मोठे हस्तीदंत असतात. मादी हत्तीचे हस्तीदंत हे इतके छोटे असतात की ते क्वचितच दिसतात. 

हस्तीदंत हे सतत वाढत असतात. हे हस्तीदंत ९० ते १०० किलोपर्यंत वजनाचे देखील असू शकतात. 

हत्तीच्या ह्रदयाचे ठोके देखील फार कमी असतात. हत्तीच्या ह्रदयाचे ठोके प्रतिमिनिट २७ इतके कमी असतात. 

Click Here