भारतात विविध राज्यांमध्ये विविध भाषा बाेलल्या जातात. एकूण भारतीयांपैकी किती जण मराठी भाषेत बाेलतात? अन्य भाषिकांचे प्रमाण किती? तुम्हाला माहिती आहे का?
२०११ साली झालेल्या जनगणनेनुसार, देशात १२१ हून अधिक बाेली भाषा आहेत. त्यात मराठीचा कितवा नंबर लागताे, याविषयी जाणून घेऊ या.
४४% भारतीय हे हिंदी बाेलतात. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली येथे प्रामुख्याने हिंदी बाेलली जाते.
भारतातील ९ % लाेक बंगाली भाषा बाेलतात. पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामच्या काही भागांमध्ये बंगाली भाषा बाेलली जाते.
८ % लाेक हे राेजच्या राेज मराठी भाषेचा वापर करतात. महाराष्ट्राच्या इतिहास, सांस्कृतिक, सामाजिक जीवनात मराठी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
महाराष्ट्राची प्रमुख भाषा ही मराठी आहे. गाेवा राज्यातही मराठी बाेलणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. साहित्य कला क्षेत्रात मराठी भाषेच याेगदान आहे.
भारतातील एकूण ६.७ % लाेक तेलगु भाषा बाेलतात. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरी येथे तेलगु भाषेचा प्रामुख्याने वापर केला जाताे.
भारतातील ६ टक्के लाेक हे तमिळ भाषेत बाेलतात. तामिळनाडूची तमिळ ही प्रमुख भाषा आहे. पद्दुचेरीमध्येही तमिळचा वापर केला जाताे.