वारंवार फोन चेक केल्याने मेंदूला सतत नवीन माहितीवर प्रक्रिया करावी लागते, ज्यामुळे मानसिक थकवा येतो.
'न्यूरोसायन्स'नुसार', सतत मोबाईल चेक करणे ही सवय, तुमच्या मेंदूला थकवून टाकते.
फोनवर सतत येणारे नोटिफिकेशन्स मेंदूला एका 'थकलेल्या' (Tired) अवस्थेत नेतात, ज्यामुळे मेंदू कठीण कामे करत नसतानाही थकल्यासारखा वाटतो.
सतत येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर ताण येतो. यामुळे एकाग्रता कमी होते आणि मेंदू 'टायर्ड' स्टेटमध्ये जातो.
जेव्हा मेंदूला एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडले जाते, तेव्हा लक्ष विचलित होते आणि स्मृतीशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
सतत फोन स्क्रीनकडे पाहिल्यामुळे मेंदूतील 'डोपामाइन' रिसेप्टर्सवर अतिताण येतो, ज्यामुळे कामातून लक्ष विचलित होऊन मेंदूवर जास्तीचा ताण येतो.
काय पाहायचे, कशावर कमेंट करायची किंवा काय इग्नोर करायचे, असे अनेक निर्णय घेताना मेंदूच्या कार्यक्षमतेवर ताण येतो.
झोपण्यापूर्वी सतत मोबाईल स्क्रीनचा वापर केल्याने झोपेचे चक्र विस्कळीत होते.
मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीरातील 'कोर्टिसोल हार्मोन्स' वाढते, ज्यामुळे लाईफस्टाईलशी संबंधित आजार होऊ शकतात.
जेवताना फोन वापरल्यामुळे अन्नातील पोषक तत्वांच्या शोषणावर विपरीत परिणाम होतो.