जगात ग्लाेबल वाॅर्मिंगमुळे अनेक बदल दिसून येत आहेत. पण, काही बदल हे असे आहेत की, जगाचा नकाशाच बदलून जाणार आहे.
जगाच्या नकाशावर देश आज अस्तित्वात आहेत. पण, भविष्यात ग्लाेबल वार्मिंगचा परिणाम म्हणून नकाशावर दिसणार नाहीत, असे सांगितले तर?
हाेय, पण पृथ्वीच्या पाठीवर हाेणाऱ्या बदलांचा परिणाम जगातील काही बेटांवर हाेताे आहे. यामुळे या बेटांचे भविष्यच धाेक्यात आले आहे.
ग्लाेबल वाॅर्मिंगचा परिणाम समुद्राच्या पातळीवर हाेताे आहे. समुद्राची पातळी वाढल्याने काही बेटांवरून लाेकांना दुसऱ्या ठिकाणांवर हलवण्यात आले आहे.
हवामानातील बदल, प्रदुषण, वादळ यामुळे हिमनग वितळत आहेत. याचा परिणाम समुद्राची पातळी वाढीवर हाेत आहे.
फिजी बेटे ही पॅसिफिक महासागरातील बेटे. या गावांमध्ये राहणऱ्या लाेकांना आधीच दुसऱ्या ठिकाणी उंचावर स्थलांतरित करण्यात आले आहे.
किरीबाटी हे एक छाेट राष्ट्र आहे. पण, सध्या जगातील बुडून गायब हाेणारा पहिला देश अशी ओळख मिळण्याच्या वाटेवर आहे.
मार्शल आयलंड्स इथे समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे शेतीला, पिण्याच्या पाण्याला धाेका निर्माण झाला आहे. यामुळे लाेकवस्तीला धाेका निर्माण झाला आहे.
मालदीव म्हणजे एक प्रकारे निसर्गाचा स्वर्गच मानला जाताे. पण, २१०० पर्यंत ही बेटे देखील बुडून जाण्याचा धाेका असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
निसर्गांच्या या बदलांमुळे 'क्लायमेट रिफ्युजी' ही नवीन संज्ञा अस्तित्वात आली आहे.
निसर्गाच्या बदलांमुळे अनेक लाेकांना आपली घर, संस्कृती, भाषा साेडून दुसरीकडे जाऊन राहावे लागत आहे.
या गाेष्टी टाळण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणे हा एकमेव पर्याय असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.