मोड आलेले बटाटे वापरावे की नाही?

बरेच दिवस बटाटे वापरात आले नाही की त्याला मोड येतात, पण असे मोड आलेले बटाटे वापरणे योग्य की अयोग्य ते पाहू. 

घरात भाज्या नसल्या की मदतीला धावून येतो तो म्हणजे बटाटा, त्यामुळे प्रत्येक घरात साठवणुकीत बटाटा असतोच असतो!

मात्र, बटाटा खूप दिवस साठवून ठेवला की त्याला मोड येतात आणि बायका ते मोड काढून बटाटे वापरतात; मात्र ते योग्य नाही. 

कडधान्याला मोड येणे आरोग्यासाठी चांगले पण मोड आलेले बटाटे वापरणे आरोग्यासाठी हितावह मानले जात नाही. 

बटाट्यांना मोड येण्यामागे एक रासायनिक प्रक्रिया घडते, जी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. 

मोड आलेल्या बटाट्यांमध्ये सोलेलीन नावाचे विषारी द्रव्य तयार होते, जे शरीरासाठी अपायकारक मानले जाते. 

मोड आलेल्या बटाट्याचे पदार्थ खाल्ल्याने फूड पॉइझन तसेच आरोग्याच्या इतर तक्रारी उद्भवू शकतात. 

उन्हाळ्यात बटाट्यांना मोड येण्याचे प्रमाण जास्त असते, अशा वेळी बटाटे हवेशीर ठेवणे योग्य ठरते. 

हिरव्या रंगाचा मोड आलेला बटाटा चुकूनही वापरू नका, आरोग्याच्या तक्रारींना ते आमंत्रण ठरेल. 

नेहमी कोरडा, स्वच्छ आणि मोड न आलेला बटाटा आपल्या रोजच्या स्वयंपाकात वापरणे केव्हाही चांगले!

Click Here