तीळ खाल्ल्यामुळे अनेक शारीरिक समस्या दूर होतात. त्यामुळे त्याला सूपरफूडही मानलं जातं.
मकरसंक्रांत म्हटलं की घराघरात तिळाचे लाडू आवर्जुन केले जातात. हिवाळ्यात तिळाचे लाडू खाण्याचे अनेक फायदे आहेत.
तीळ खाल्ल्यामुळे अनेक शारीरिक समस्या दूर होतात. त्यामुळे त्याला सूपरफूडही मानलं जातं. म्हणूनच, तीळ खाण्याचे फायदे कोणते ते पाहुयात.
तिळामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे दात आणि हिरड्या यांचं आरोग्य चांगलं राहतं. तीळ शक्यतो सकाळच्या वेळी भाजून खावेत.
तिळामुळे मेटाबॉलिझम वाढतो. ज्यामुळे पचन सुधारते.
भाजलेले तीळ सकाळी खाल्ल्याने यकृत आणि पोटाला चालना मिळते आणि जठराग्नी सुधारतो.
तिळाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. तिळामध्ये आढळणारे सेसमिन हे अँटिऑक्सिडेंट आहे, जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करते.
होईल तिळात असे अनेक घटक आढळतात जे तणाव आणि नैराश्य कमी करण्यास मदत करतात.
तिळाच्या बियांमध्ये भरपूर मॅग्नेशियम असते जे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.