काळे डाग पडलेले कांदे खाताय? आजच व्हा सावध

कांद्यावर असलेले हे काळ डाग शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. 

अनेक घरांमध्ये वर्षभरासाठी एकदाच कांदा खरेदी केला जातो. त्यामुळे खरेदी केलेल्या या कांदांच्या काळजीही तितकीच घ्यावी लागते.

बऱ्याचदा कांदा खरेदी करतांना त्यावर पावडरसारखे काळे डाग असतात. मात्र,त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ते तसेच खरेदी करतो.

कांद्यावर असलेले हे काळ डाग किंवा पावडर शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात.

कांद्यावर असलेले हे काळ डाग म्हणजे ती एक प्रकारची बुरशी असते. ही बुरशी जेवणावाटे शरीरात गेली तर अॅलर्जी, संसर्ग होऊ शकतो.

बुरशी लागलेले कांदे खाल्ले तर फूड पॉयझनिंग होऊ शकतं. ज्यामुळे उलटी, जुलाब, पोटाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात.

या कांद्यांमुळे इंफेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना यामुळे फंगल इंफेक्शन लगेच होऊ शकतं.

काही बुरशींमध्ये मायकोटॉक्सिन्स नावाचे विषारी रसायन तयार होते. हे रसायन शरीरात गेले तर यकृत, मूत्रपिंड, त्वचा यांवर वाईट परिणाम करू शकते.

साडीला द्या नवा लुक! मागच्या गळ्याचे डिझाईन्स तुम्हाला बनवतील फॅशन क्वीन.

Click Here