मशरुम अत्यंत गुणकारी असून त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
सुपरफूड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ड्रायफ्रूट्स, कडधान्य, पालेभाज्या असे अनेक घटकपदार्थ येतात. परंतु, यांच्या व्यतिरिक्त आणखी एक सुपरफूड आहे ते म्हणजे मशरुम.
मशरुम अत्यंत गुणकारी असून त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हे फायदे नेमके कोणते ते पाहुयात.
मशरुम खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. त्यामुळे आहारात आवर्जुन मशरूमचा समावेश करावा.
मशरुममुळे शरीरातील चांगलं कोलेस्ट्रॉल आणि एचडीएल सुधारण्यास मदत मिळते. तसंच हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
मशरुमचं नियमित सेवन केल्यास थकवा, नैराश्य यांसारख्या समस्या दूर होतात.