सध्याच्या काळात प्रत्येक जण जंकफूडच्या आहारी गेला आहे. यात मोमोज तर अनेकांच्या पसंतीचा पदार्थ.

मोमोज आज अनेक जण मोठ्या आवडीने खातात. परंतु, ते खाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत.

मोमोज खाल्ल्यामुळे कॅलरीज वाढतात. ज्यामुळे वजन वाढतं. परिणामी, लठ्ठपणा, स्थुलपणा या समस्या निर्माण होतात.

मोमोज करण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. ज्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. विशेष म्हणजे नियमितपणे मोमोज खाल्ल्यामुळे टाइप २ चा मधुमेह होण्याची शक्यता असते.

तळलेले मोमोज तसंच मोमोजच्या आतील फिलिंग्समध्ये ट्रान्स फॅट्स असतात ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढतं. तसंच त्याच्यासोबत चटणी खाल्ल्यामुळे रक्तदाबही वाढतो.

मोमोजची मसालेदार चटणी खाल्ल्यामुळे आम्लपित्ताची समस्याही निर्माण होते.

चहा पिण्याचे हे नियम तुम्हाला माहितीयेत का?

Click Here