जाणून घ्या, मध खाण्याचे फायदे
नैसर्गिकरित्या गोडवा असलेला पदार्थ म्हणजे मध. पूर्वी अनेक औषधोपचारांमध्ये मधाचा वापर केला जात असते.
मध शरीरासाठी अत्यंत फायद्याचा असून त्याचे गुणकारी फायदे कोणते ते पाहुयात.
जर तुम्हाला झोपेची तक्रार जाणवत असेल तर आहारात मधाचा समावेश करा. रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा मध खा.
मध खाल्ल्यामुळे पचनसंस्थेचं कार्य सुधारतं. आणि, गॅस, अपचन, छातीत जळजळ होणे यांसारख्या समस्या दूर होतात.
मधाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.
मध आणि जायफळ एकत्र मिक्स करुन याचं चाटण घेतल्यास सांधेदुखीची समस्या दूर होते.