शरीरातील लोह वाढवण्यासाठी खा हे पदार्थ. पाहा कोणते आहेत.
शरीराला अनेक पोषणसत्वांची गरज असते. त्यापैकी एक म्हणजे लोह. ते मिळवण्यासाठी आहारात काही ठराविक पदार्थ असणे फार गरजेचे असते.
हरभरा, चणे , चणाडाळ या अशा पदार्थांत लोह भरपूर असते. त्याचा आहारात समावेश असायला हवा.
ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या तृणधान्यांमध्ये भरपूर लोह असते. त्याची भाकरी रोजच्या आहारात असावी.
मेथीची भाजी, आमटी, पराठा असे विविध पदार्थ केले जातात. मेथीमध्ये फायबर - लोह असते.
सफरचंद, डाळिंब अशा फळांमध्येही लोहाचे प्रमाण भरपूर असते. रोज एखादे फळ खा.
कडधान्यांमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. आहारात कडधान्ये असायलाच हवीत.
हिवाळ्यात पालकाची भाजी मस्त ताजी मिळते. पालकात लोहाचे प्रमाण जास्त असते. त्याची भाजी, आमटी आहारात असावी.