‘ही’ ६ फळं खा अन् दिसा चिरतरुण
आपल्या आहारात फळांचा समावेश केला तर त्वचेत हमखास फरक दिसू लागतो. त्वचा आणखी सुंदर दिसते.
डाळिंबात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
पपईमध्ये असलेले पपेन हे एंजाइम त्वचेतील डेड स्किन काढून टाकतं आणि त्वचा आतून स्वच्छ आणि मऊ करतं.
किवी त्वचेच्या पेशी दुरुस्त करतं, कोलेजनचं उत्पादन वाढवतं आणि त्वचा तरुण ठेवतं.
एव्हाकॅडोमध्ये असलेले हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतं आणि ड्राय स्किनची समस्या दूर करतं.
ब्लूबेरीमध्ये आढळणारे अँथोसायनिन्स त्वचेच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात आणि त्वचा चमकदार बनवतात.
संत्र्यामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी त्वचा उजळण्यास मदत करतं आणि सन डॅमेजपासून देखील संरक्षण करतं.