किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

'हे' पदार्थ खा आणि किडनीचं आरोग्य ठेवा चांगलं

शरीराचं कार्य सुरळीत चालावं यासाठी आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा आवर्जुन समावेश करायला हवा.

हाडांसाठी, त्वचेसाठी कोणते पदार्थ आहारात घ्यावे याविषयी सगळेच बोलतात. परंतु, किडनीचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत ते पाहुयात.

किडनीचं आरोग्य  चांगलं ठेवायचं असेल तर दररोज पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. साधारणपणे दिवसाला ८ ते १० ग्लास पाणी नक्की प्यावं

लसणामध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे किडनीच्या पेशींना नुकसान पोहोचण्यापासून संरक्षण मिळतं. म्हणून आहारात लसणाचा समावेश करावा.

हळदीमध्ये कर्क्युमिन (Curcumin) नावाचे सक्रिय घटक असते, जे किडनीतील सूज आणि संसर्ग कमी करण्यास मदत करते.

 काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, जे शरीराला हायड्रेट ठेवते आणि किडनी स्वच्छ करण्यास मदत करते.

केस विंचरण्यासाठी वापरा लाकडी कंगवा!

Click Here