बडीशेपचे आरोग्यदायी फायदे
अनेक जणांना जेवण झाल्यानंतर बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप मुखवास म्हणून जरी आपण खात असलो तरीदेखील तिचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत.
बडीशेप खाल्ल्यामुळे अन्नपचन नीट होते. तसंच पोटात गॅस निर्माण होऊ देत नाही.
बडीशेपमुळे अपचनाची समस्या दूर होते. जुलाब, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे यांसारख्या समस्येमध्ये बडीशेपचं सेवन करावं.
जर भूक लागत नसेल तर एक चमचा बडिशेप चूर्णात दोन चमचे मध टाकून त्याचे चाटण रोज एक वेळा घ्यावे. यामुळे भूक वाढण्यास मदत मिळते.
स्मरणशक्ती सुधारण्यासाठी व बुद्धी तरतरीत ठेवण्यासाठी बडिशेप चूर्ण आणि तूप यांचं चाटण घ्यावं.
मासिक पाळीमध्ये जर पोटात दुखत असेल, तर त्यासाठी एक चमचा बडिशेप रोज तीन वेळा चावून खावी.
(वरील माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय, प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञ वा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)