कडधान्यांमध्ये आवर्जुन खाल्लं जाणारं कडधान्य म्हणजे मटकी. प्रत्येकाच्या घरी महिन्यातून एकदा तरी मटकीची उसळ नक्कीच केली जात असेल.
मटकी अनेकांच्या आवडीची असून ती गुणकारी सुद्धा आहे.
मटकी मलावरोधी आहे. त्यामुळे मलावरोधाची समस्या असेल तर ती दूर होते.
मटकी खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं.
सर्दी, खोकला झाला असेल तर मटकीचं कढणं प्यावं. यासाठी उकडलेल्या मटकीच्या पाण्यात थोडंसं दही, चिमुटभर साखर, मीठ घाला. त्यानंतर त्यावर मोहरी, जिरं, कढीपत्त्याची फोडणी द्या.
मटकीतील पोटॅशियममुळे रक्तवाहिन्या सुरळीत काम करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात.
मटकी लोहचा स्रोत असल्यानं अॅनिमियापासून संरक्षण मिळतं.
तुमचे मूड स्विंग्स होतात? मग असू शकते Vitamin D कमी