चविष्ट पदार्थ खाऊनही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी डाळी हा उत्तम पर्याय आहे. विविध पद्धतीने डाळींचा समावेश करून डाएट प्लॅन केल्याने वजन नियंत्रणात राहते.
मूग डाळ, तूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ, राजमा या प्रकारच्या डाळींचा जेवणात समावेश करा. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत हाेईल.
डाळींमध्ये असलेल्या प्रथिनं आणि फायबरमुळे खाल्यावर बराच वेळ पाेट भरल्यासारखे वाटते. यामुळे जास्त प्रमाणात खाले जात नाही.
डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. स्नायूंच्या वाढीसाठी प्रथिने आवश्यक असतात. शाकाहारी लाेकांसाठी डाळी हा प्रथिनांचा मुख्य साेर्स आहे.
डाळींमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत हाेते. बद्धकाेष्ठता हाेत नाही.
डाळींमधील पाेषक तत्त्वे शरीरात उर्जा निर्माण करतात. यामुळे थकवा, अशक्तपणा जाणवत नाही.
डाळींमध्ये कॅल्शियम, फाॅस्फरससारखे घटक असतात. डाळींचे सेवन केल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत हाेते.
राेजच्या जेवणात डाळींचे सेवन केल्यास तुम्ही फिट तर राहाल, पण तुमची शक्तीदेखील खूप वाढेल.