काहीही खाल्ले तरी अपचनाचा त्रास, पोटदुखी होते. सोपा उपाय करुन पाहा.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पचनसंस्थेशी संबिधत अनेक समस्या उद्भवतात. या समस्या कमी करण्यासाठी आहारात बदल करा.
आल्याचा रस पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करतात. तसेच शरीराला अनेक फायदे देतात.
पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी आल्याचा तुकडा किसून घ्या, त्याचा रस कोमट पाण्यात मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.
आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे पोषक तत्व असते. जे पोटातील वायू आणि पोटफुगी कमी करण्यास मदत करते.
जेवल्यानंतर बडीशेपचे पाणी प्या. यामुळे पचनसंस्था मजबूत होते.
रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर बडीशेप पाण्यात भिजवा. सकाळी गाळून हे पाणी रिकाम्या पोटी प्या.
यात असणारे पाचक एंजाइम शरीराल सक्रिय करतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
आवळ्याचा रस केसांसह पचनसंस्थेसाठी चांगला मानला जातो.
पचनसंस्था मजबूत करण्यासाठी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्या.
हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे पचनसंस्था मजबूत करतात.
कोमट पाण्यात चमचाभर हळद पावडर घालून रिकाम्या पोटी प्या. यात काळीमिरी घालून देखील हे पाणी पिऊ शकता.